स्मृती इराणी यांना झटका, बनावट पदवीप्रकरणी

0
10

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. २४: – केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध बनावट पदवी प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका दिल्लीतील पटियाला न्यायालयाने मान्य केली आहे. पुढील सुनावणी 28 ऑगस्ट रोजी होणार आहे.इराणी यांनी लोकसभा तसेच राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती दिली होती. मात्र प्रत्येकवेळी त्यांच्या माहितीमध्ये तफावत आढळून आली होती. दरम्यान इराणी यांनी निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत अहमर खान यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज (बुधवार) या याचिकेबाबतची पहिली सुनावणी होती. न्यायालयाने ही याचिका मान्य केली आहे. तसेच 28 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे. पुढील सुनावणीनंतरच इराणी यांना आरोप म्हणून समन्स बजावण्यात येणार का, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान न्यायालयाने ही याचिका मान्य केल्याने इराणी यांना मोठा धक्का बसला असून विरोधी पक्षांनी मोठा मुद्दा सापडला आहे. आम आदमी पक्षाचे माजी मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांना बनावट पदवीप्रकरणी अलिकडेच अटक करण्यात आली आहे.