पित्याचे नाव उघड न करता अविवाहित महिलाही बनू शकते कायदेशीर पालक

0
8

नवी दिल्ली, दि. ६ – पाल्याच्या पित्याचे नाव उघड न करता अविवाहित महिला पाल्याचा एकटीने कायदेशीर पालक म्हणून सांभाळ करू शकते असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. त्यासाठी पाल्याच्या वडिलांच्या संमतीची गरज नाही, असेही कोर्टाने नमूद केले. न्यायालयाचा हा निर्णय ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. न्यायमूर्ती विक्रमजित सेन यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निकाल दिला.
जर एखाद्या महिलेला पाल्याचे वडील कोण याची ओळख उघड करायची नसेल, तर त्यास हरकत घेता येणार नाही. त्यामुले कोणत्याही कायदेशीर कागदांवर पाल्याच्या पित्याचा उल्लेख न करता ती महिला पाल्याचा एकमेव पालक म्हणून सांभाळ करू शकले.
एक अविवाहित महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला. पालक म्हणून पिता कोण आहे व पित्याचेच नाव पालक म्हणून लावण्याच्या परंपरेविरोधात त्या महिलेने याचिकेच्या माध्यमातून आवाज उठवला होता.