पाककडून भारताची हेरगिरी, राजस्थान बॉर्डरवर बसवले CCTV कॅमेरे

0
9

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. ११:-पाकिस्तान भारताविरोधात एका पाठोपाठ एक कुरापत करत आहे. वारवांर शस्त्रसंधीचे उल्लेघंन करणार्‍या पाकिस्तानने आता चक्क आंतरराष्ट्रीय नियमाची पायमल्ली केली आहे. पाकिस्तानने भारताची हेरगिरी करण्‍यासाठी राजस्थानच्या सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने कडाडून विरोध केल्यानंतरही पाकिस्तान- भारत आंतरराष्ट्रीय सीमेपासून 200-300 मीटर अंतरावर हे कॅमेरे बसवले आहेत.
बीएसएफने पाक रेंजर्सकडे या प्रकरणी विचारणा केली आहे. परंतु पाकिस्तानकडून त्यावर अद्याप खुलासा झालेला नाही. डीआयजी किंवा आयजी स्तरावरील बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्‍यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

चार जिल्ह्यांच्या सीमेवर कॅमेरे बसवले…
राजस्थानातील बाडमेर, जैसलमेर, बीकानेर आणि श्रीगंगानगरच्या भारतीय सीमेवरील लष्काराच्या चौक्यांसमोर पाकने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचे काम जोरात सुरु आहे. कॅमेरे बसवण्यासाठी सीमेवर पलिकडून 15-15 फूट उंच पोल उभे करण्‍यात आले आहेत. तसेच झुडपांमध्येही कॅमेरे बसवले आहेत.