रानडुकराच्या हल्ल्यात चार जखमी

0
13

गोंदिया,दि.२२:- तालुक्यातील तेढवा येथे शेतशिवारात रानडुकराच्या हल्ल्यात चार जण जखमी झाल्याची घटना आज (ता.२२)घडली. यातील तीन जखमींवर दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून गंभीर असलेले दुर्योधन भुजमल qसहमारे (वय ५०) रा. तेढवा यांच्यावर केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये बासंताबाई दुर्योधन qसहमारे (वय ४५), देवेश्वर गोमा हटेले (वय ४०), ऊर्मीला सहेष मात्रे (४०) सर्व रा. तेढवा यांचा समावेश आहे.
प्रकरण असे की, दुर्योधन qसहमारे हे पत्नी बासंताबाईसह घरातील म्हशी चारायला शेतशिवारात गेले असता अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. दुर्योधनाने आरडाओरड केल्याने पत्नी बासंता कुèहाड घेऊन धावत आली. मात्र तिच्यावरही रानडुकराने हल्ला चढविला. यावर बासंतीबाईने आपल्या म्हशींना नावाने हाक मारली असता म्हशी धावत आल्याने रानडुक्कर पळून गेल्याचे तिने सांगितले. याच रानडुकराने पुढे पळता-पळता शेतात काम करीत असलेले देवेश्वर गोमा हटेले व ऊर्मीला सहेष म्हात्रे यांच्यावरही हल्ला केला. या प्रकरणाची माहिती गावकèयांना मिळताच त्यांनी चौघांना तातडीने दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर असलेल्या दुर्योधन qसहमारे यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.