बाजार समिती अध्यक्षपदी माजी आमदार मानकर

0
15

महेश मेश्राम

आमगाव,दि.२६ -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. यात सभापतीपदी माजी आमदार केशवराव मानकर व उपसभापती रविदत्त अग्रवाल निवडून आले. केशव मानकर व रविदत्त यांना १३-१३ मते मिळाली. प्रतिस्पर्धी म्हणून राकाँपाचे टिकाराम मेंढे हे सभापती पदाचे उमेदवार होते त्यांना पक्षाची पाच मते मिळाली. तर उपसभापती पदाकरिता उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार विनोद कल्लमवार यांना सुद्धा पाच मते मिळाली.
१९ सदस्यीय समितीमध्ये भाजपाचे ९, काँग्रेसचे ४, राकाँपाचे ५ व अपक्ष १ असे संचालक निवडून आले. या निवडणुकीत भाजपा व काँग्रेस अशी युती असल्याने यावेळी भाजप-काँग्रेसचीच सत्ता येणार हे स्पष्ट होते. अपक्ष म्हणून निवडून आलेले गोकुल माहेश्वरी यांनी भाजपाला समर्थन दिल्याने १३ विरुद्ध ५ असा विजय संपादन केला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक वर्षापासून भाजपाचीच सत्ता होती. परंतु मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपकडून राकाँने सत्ता हस्तांतरित केली होती. यावेळी मात्र भाजपने काँग्रेसशी हात मिळवणी करून या समितीवर कब्जा केला. निवडून आलेले संचालक संजय नागपुरे, सुभाष आकरे, सतीश आकांत, युवराज बिसेन, उमेंद्र रहांगडाले, विकास महारवाडे, सौ. qचतन तुरकर, सौ. शांताबाई राखडे, सर्व भाजपचे तर काँग्रेसकडून बंशीधर अग्रवाल, रमन्ना मिश्रा, रामेश्वर शामकुंवर आणि अपक्ष म्हणून गोकुल माहेश्वरी निवडून आले होते.