सेवा सहकारी संस्थेवर सहकार गटाचे वर्चस्व

0
8

सुकडी(डाकराम) ,दि.२७ -: विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सुकडी-डाकरामची (र.नं. ५४६) निवडणूक दोन वेगवेगळ्या गटामध्ये लढविण्यात आली. या निवडणुकीत सहकार गटाचे १२ उमेदवार विजयी झाले.सुकडी/डाकराम हे परिसरातील गावांचे केंद्र असल्याने सर्व आजूबाजूच्या गावांची नजर या निवडणुकीवर होती. सहकार गटाचे नेतृत्व माजी अध्यक्ष विलास मेश्राम, तंमुसचे अध्यक्ष शिवचरण बोरकर, माजी उपसरपंच जगदीश बावनथडे व निलेश बावनथडे यांनी केले. तर जय किसान एकता पॅनलचे नेतृत्व माजी तंमुस अध्यक्ष रामचंद्र गभणे, माजी सरपंच संजय चंद्रिकापुरे, माजी सरपंच प्रल्हाद दखणे व भैयालाल बागडे यांनी केले.
९७ व्या घटनादुरुस्तीमुळे थकीत सभासदांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे मतदारांची संख्या कमी होती. त्यामुळे निवडणुकीचा सामना निवडणुकीचे फार्म भरण्यापासून मोठय़ा अटीतटीत रंगला होता. निवडणुकीला प्रतिष्ठेचा मुद्दा बनविण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही गटांनी प्रत्याची पराकाष्ठा केली.
परिणामी या निवडणुकीत सहकार गटाचे १२ तर जयकिसान एकता पॅनलमधून केवळ एक महिला उमेदवार निवडूण आली.
यात सहकार पॅनलमध्ये विलास मेश्राम, तेजराम मानकर, रतन बिसेन, महेंद्र बिसेन, भावराव कुर्वे, लालचंद पटले, नेपाल आमदे, शामराव खोब्रागडे हे सर्व साधारण गटातून तर इमाप्रमधून निलेश बावनथडे, अनु.जाती-जमाती गटातून उद्धव चंद्रिकापुरे व महिला गटातून चंद्रकांता बिसेन तर जय किसान पॅनलच्या केवळ महिला गटातून पुष्पा नामाजी बिसेन ही एक महिला निवडून आली.