राका ग्रामपंचायतवर काँग्रेस पक्षाचा ताबा

0
14

सडक-अर्जुनी,दि.१७- तालुक्यातील ग्राम राका येथील ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतवर काँग्रेसचे ९ सदस्य निवडून आल्याने या ग्रामपंचायतवर काँग्रेसचे स्पष्ट बहूमत सिद्ध झाले. यामुळेच ९ सप्टेंबर रोजी झालेली सरपंच व उपसरपंचांची निवडणूक अविरोध पार पडली.

सरपंच पद खुले (महिला) असल्यामुळे सरपंच पदाकरिता रेखा सुरेश चांदेवार यांनी तर उपसरपंच पदासाठी वसंता तुकराम उपरिकर यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. वरिल पदाकरीता त्यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत आनंद फुंडे, राजीराम जैराम चांदेवार, जनार्धन शालिकराम मेंढे, पुजा पवन पडोळे, अर्चना सुरेश मेश्राम, कांता जगदिश नागोसे, पुष्पा अशोक गोटेफोडे यांनी निवडणुकीत सहभाग घेतला.

निवडणुकीदरम्यान मधुसूदन दोनोडे, दुधराम बावनकर, कैलास रामटेके, राजकुमार बहेकार, कैलास ब्राह्मणकर, एकनाथ मेंढे, रमेश दोनोडे, उमराव रामटेके, नामदेव चाकाटे, बाबुराव धुर्वे, लियाकत अली सैय्यद, सुरेश मेश्राम व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अध्यासी अधिकारी पवार तर सहायक म्हणून तलाठी पिंपळे, ग्रामसेवक देशमुख, कटरे यांनी निवडणूक पक्रिया पार पाडली.