देवरी बाजार समिती सभापतीपदावर रमेश ताराम

0
7

देवरी, दि.१९-:- गोंदिया जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीच्या पहिल्या निवडणुकीत १९ संचालकांपैकी १५ संचालक निवडून राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समितीवर वर्चस्व मिळविले होते.त्यातच आज शनिवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे रमेश ताराम तर उपसभापतीपदावर विजय कश्यप यांची निर्विरोध निवड झाली आहे.
यावेळी संचालक गोपाल राऊत, रियाफ खान, सिताराम रक्षा, अनिल वालदे, दुर्गा तिराले, सौ. पुनियाबाई मडावी, श्रीराम मडावी, द्वारका धरमगुळे, हरिदास राऊत, अनिल अग्रवाल,भैय्यालाल चांदेवार, मारोती खंडारे उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती,उपसभापतींचे अभिनंदन आमदार राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी,भंडारा अब्रन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, विजय शिवणकर, देवेंद्रनाथ चौबे, सी.के.बिसेन,गोपाल तिराले,बबलू कटरे आदनी अभिनंदन केले आहे.