वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

0
7

संतोष रोकडे
इटखेडा(गोंदियाः)दि.१९. गोंदिया जिल्ह्याला लागूनच असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-वडसा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी उघडकीस आली.ही घटना वडसा मार्गावरील गेवर्धा पहाडीजवळ घडल्याचे वडसा वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी शंगर गाजलवार यानी सांगितले.तसेच त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करुन पंचनामा केला.चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही भागात सुध्दा मोठ्या प्रमाणात बिबट व वाघांचा अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याने महाराष्ट्रातील वाघ व बिबट्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे शासनाला या रस्त्यावर वन्यप्राण्यांच्या ये जा करण्यासाठी ठिकठिकाणी अंडरपास निर्माण करण्याची गरज झाली आहे.