शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाशल्यचिकित्सकाची भेट

0
14

गोंदिया दि.१९- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काही महिन्यापुर्वीच नोकरीवर लागलेल्या एका आरोग्य सेविकेने आपल्या कामात हलगर्जीपणा करीत उपचारासाठी दाखल असलेल्या दोन रुग्नांना शुक्रवारला चुकीचा रक्त गट लावल्याने त्या दोघांची प्रकृती अद्यापही चिंताजनक परिस्थितीत आहे.यातच रुग्णालयात गेल्या अनेक दिवसापासून वैद्यकीय अधिकारी व तेथील कर्मचारी रुग्णांच्या तपासणीकडे व्यवस्थित लक्ष देत नसल्याने रुग्णालयातील गोंधळाचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.या मुद्याला घेऊन शिवसेनेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.रवी धकाते यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात रुग्णालयातील कारभार सुव्यवस्थित करण्याची मागणी करण्यात आली असून भविष्यात अशा घटना घडल्यास आंदोलनाचा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व गोंदिया जिल्हा दुग्ध सहकारी संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख तेजराम मोटघरे,हर्षपाल रंगारी,हंसु वासनिक युवासेनेचे जिल्हा प्रमुख समीर आरेकर,शहरप्रमुख पुरूषोत्तम ठाकरे, उपशहरप्रमुख परेश अनवानी, अतुल दादूरिया,भारतीय विधार्थिसेना जिल्हा प्रमुख प्रशांत कोरे,शिवप्रतिस्ठानचे गोंदिया प्रमुख दुर्गेश राहागडाले,अभय मानकर,हर्शल पवार यांच्यासह शिवसनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी हलगर्जीपणा करणार्या नर्सला निलबिंत करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
सविस्तर असे की,शुक्रवारला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सयद अक्रम या रुग्णाला A पाॅझीटीव ( A + ) रक्त गट लावयचे असताना मात्र नर्सने चुकीने B पाॅझीटीव ( B + ) रक्त गट लावला. तर ईश्वरदास उके या रुग्णाला B पोजेटीव ( B + ) रक्त लावयचा असताना मात्र चुकीने A पाॅझीटीव ( A + ) रक्त लावल्याने त्यांची प्रकृती खालावली.त्यामुळे त्यांना तत्काळ अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते.