कंटगी मध्यमप्रकल्पाच्या वसाहतीतील साहित्य चोरीला

0
8

कर्मचाèयाअभावी चोरट्यांना रान मोकळे

गोरेगाव,दि.२२: -गोंदिया मध्यम पाटबंधारे विभागातंर्गत येत असलेल्या कटंगी मध्यम प्रकल्पस्थळी प्रकल्पालाच्या देखरेखीकरिता तयार करण्यात आलेल्या वसाहतीची वाताहत झाली आहे.या वसाहतीसोबतच गोदामातील साहित्याकडेही विभागाने दुर्लक्ष केल्याने तेथील किमती साहित्य चोरीला गेले आहे.आजपर्यंत गोरेगाव पोलीस ठाण्यात ३ ते ४ वेळा मध्यमप्रकल्पातील साहित्याची चोरी झाल्याची तक्रार खुद्द विभागाच्यावतीने नोंदविण्यात आली तरीही त्याठिकाणी कर्मचारी नेमण्याकडे दुर्लक्ष करण्यामागची विभागाची भूमिका संशयास्पद वाटते.त्यातच गेल्या महिन्यात तर एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या फार्महाऊसवर येथील साहित्य विनापरवानगी नेण्यात आले होते.परंतु जेव्हा पत्रकारांना हा विषय कळला तेव्हा परत ते साहित्य त्याच ठिकाणी ठेवण्यात आले होते.
कटंगी मध्यम प्रकल्पाच्या देखरेखीकरिता कर्मचारी नियुक्त नसल्याने अनेक साहित्याची चोरी झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रकल्प वाèयावर सोडण्यात आल्याचा आरोप होत आहे.येथून चार कि.मी. अंतरावर असलेल्या कटंगीच्या शेत शिवारात ६ जानेवारी १९९६ ला महादेवराव शिवणकर पाटबंधारे व लाभक्षेत्र विकासमंत्री असताना या मध्यम प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.त्यावेळी या प्रकल्पाच्या देररेखीसाठी ४ गोदाम, दोन निवासी घरे, एक परिचर निवास तयार करण्यात आले होते. या इमारती व साहित्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष असल्याने कटंगी मध्यम प्रकल्प वाèयावर सोडण्यात आल्याचे कटंगीवासीयांचे म्हणणे आहे. कटंगी मध्यम प्रकल्पाच्या कामाला गती येण्यासाठी व साहित्य ठेवण्यासाठी चार गोदाम, दोन कर्मचारी निवास, चपराशी निवास, मालवाहक ट्रक, रोलर, वनोपज सागवानाची झाडे, बांबू व इतर झाडे लावण्यात आली होती. कर्मचारी प्रकल्पाची कामे सुरू असताना निवासस्थानी राहत होते. परंतु दोन वर्षांपासून या ठिकाणी कर्मचारी नियुक्त नाही. दरम्यान गोदामाची लाकडी दारे, खिडक्या, रोलरचे साहित्य, मालवाहक ट्रकचे साहित्य, चोरट्यांनी चोरून नेल्याचे प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे प्रमुख रेखलाल टेंभरे यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या देखरेखीकडे दुर्लक्ष असल्याने साहित्याची, झाडांची कत्तल करण्यात आली. यावर आळा घालण्यासाठी नियमित कर्मचारी नेमण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.