नगर पंचायत निवडणुकीकरिता सज्ज व्हा-डॉ. कोठेकर

0
6

गोंदिया,दि. २७- नव्याने तयार झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार असून या मिनी सार्वत्रिक निवडणुका आहेत. यातील सर्वाधिक निवडणुका विदर्भात आहेत. जिल्ह्यातील सर्व नगर पंचायतीवर शंभर टक्के भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापित होणे आवश्यक आहे. याकरिता कार्यकत्र्यांनी जोमाने सर्व ताकदीनिशी कामाला लागून विजय संपादन करायचा आहे, असे प्रतिपादन भाजपाचे पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी व्यक्त केले.
ते २५ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात महासंपर्क आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. यावेळी प्रामुख्याने खासदार नाना पटोले, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, माजी आमदार केशवराव मानकर, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, प्रदेश सदस्य राकेश शर्मा, अशोक इंगळे, नेतराम कटरे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. सभापती देवराम वडगाये, छायाताई दसरे, मजुर सहकारी संघाचे अध्यक्ष झामqसग येरणे, चंद्रपूरचे संघटनमंत्री भोजराज डूंबे, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, माजी सभापती सविता पुराम, उमाकांत ढेंगे, संजय कुळकणो, आदी उपस्थित होते.

बैठकीत प्रत्येक तालुक्याचा महासंपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला. तसेच नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी व कार्यकत्र्यांशी चर्चा करण्यात आली. बैठकीचे संचालन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी केले. बैठकीला प्रत्येक तालुक्यातील अध्यक्ष, महामंत्री व पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदकुमार बिसेन, तालुकाध्यक्ष चत्रुर्भूज बिसेन, शामराव शिवणकर, रघुनाथ लांजेवार, लक्ष्मण भगत, नामदेव कापगते, जि.प.सदस्य अल्ताफ शेख प्रविण दहिकर, राजेंद्र बडोले, डी.के. झरारिया, अमित झा, सुनील केलनका, महेंद्र बघेले, दामोदर नेवारे, छत्रपाल तुरकर, सुरेश कोसरकर, नितीन कटरे, घनश्याम अग्रवाल, पंकज सोनवाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.