मतिमंद पूर्वासाठी मदतीचे आवाहन

0
20

गोंदिया,दि. २७-सामाजिक दायित्व म्हणून अनेक दानशूर व सामाजिक संघटना विविध क्षेत्रात सामाजिक बांधीलकी म्हणून कार्य करीत असतात. त्यातच तालुक्यातील फुलचूर पेठ येथील १४ वर्षीय मतिमंद असलेल्या पूर्वा मनोज दहिकर या मुलीच्या उपचाराकरिता लागणाèया आर्थिक मदतीसाठी दानविरांचे व सामाजिक संस्थांचे हात पुढे करून तिला मदत करावी. अशा प्रकारची स्थिती पूर्वासमोर आली आहे.
गोंदिया फुलचूर पेठ येथील पूर्वा मनोज दहिकर ही मतिमंद व विकलांग आहे. आजच्या परिस्थितीत तिच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने तिचा योग्य उपचार होऊ शकत नाही. मागील तीन महिन्यांपासून या मुलीने जेवन अत्यंत कमी केल्याने तिची प्रकृती अधिकच खालावली आहे. तेव्हा तिच्या उपचारासाठी सामाजिक कार्य समजून काहींनी पुढाकार घेतला आहे. पण ऐवढ्यातून तिची गरज भासणार नसून पूर्वाला चांगल्या उपचारासाठी आर्थिक मदतीची अजून गरज आहे. तेव्हा पूर्वीच्या मदतीसाठी दानशूर व सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, अशी रास्त मागणी या प्रकरणाने पुढे आली आहे. समाजात आजही अनेक कुटुंब अन्नापासून एकवेळ तरी वंचित राहत असल्याचेही या प्रकरणावरून दिसून येत आहे.