राज्य सरकार गंभीर नाही – शरद पवार

0
9

मुंबई,दि. १४ – महाराष्ट्रात अभूतपूर्व असा दुष्काळ पडला आहे. मात्र, राज्य सरकार दुष्काळाबाबत अजिबात गंभीर नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर दुष्काळयात्रा काढणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शरद पवार आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असं मला वाटत नाही, परंतु समजा काही कारणानं युती तुटलीच तरी सुरुवातीला घेतलेली भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका आता राष्ट्रवादी घेणार नाही असे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिवसेना स्वत:चेच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.

काय काय म्हणाले पत्रकार परिषदेत शरद पवार
– शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे वाटत नाही. बाळासाहेबांची शिवसेना व आताची शिवसेना यात फरक
– शिवसेनेने पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही
– सरकार चालेल की नाही माहित नाही पण टिकेल
– राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्याची गरज
– दुष्काळात ठोस उपाययोजना सरकारने केल्या नाहीत
– दुष्काळग्रस्त भागात विद्यार्थ्यांची फी माफी नाही, अन्न सुरक्षा अद्याप नाही
– देशातील वातावरण बिघडलेले आहे, दादरी प्रकरणावर मोदी सरकारवर टीका
– कापूस, सोयाबीन पिकाला योग्य भाव नाही
– सरकारचे अनेक निर्णय कागदावरच, पीक विमा संदर्भात निर्णयाची अंमलबजावणी नाही
– पवारांची सनातनवर टीका, उघड धमक्या देणे ही बाब चिंताजनक
– सनातनची भाषा चिंता करण्यासारखी, सरकारने कडक भूमिका घ्यावी
– कसुरींच्या कार्यक्रमासंदर्भात जे घडलं आहे, ते अशोभनीय
– शिवसेना बाहेर पडणार नाही, ते भाजपाला बाहेर काढ़ायला निघाले आहेत

– पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे
– शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन, अशी विनंती करतो
– सहा लाख लोकांनी जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला