कटंगीच्या सरपंचपदी भाजपच्या भुमेश्वरी रहांगडाले

0
9

गोरेगाव दि.28: तालुक्यातील कटंगी (बु.) च्या सरपंचपदी भाजपच्या भुमेश्वरी शोभेलाल रहांगडाले तर उपसरपंचपदी काँग्रेसचे प्रेमलाल भगत विराजमान झाले. गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसने युती केली. या युतीची पुनरावृत्ती कटंगी ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत पाहण्यात आली. विशेष म्हणजे कटंगी येथील सरपंच पदाच्या निवडणुकीतील युती ही विरोधी मोठ्या नेत्यांच्या जिवारी लागल्याची चर्चा गावासह संपूर्ण गोरेगाव तालुक्यात सुरू आहे. नवनियुक्त सरपंच, उपसरपंचाचे गावकNयांनी अभिनंदन केले आहे.या निवडणुकीत भाजपचा एक गट राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेला होता.तर दुसरा भाजपच्या गटाने काँग्रेससोबत हात मिळवणी करुन राष्ट्रवादी काँग्रेसला सरपंच पद देणार्या भाजपच्या नेत्यांना भाजपच्याच दुसर्या गटाने धक्का देत भाजपच्या सदस्याला सरपंचपदावर बसविले.या निवडणुकीसाठी कटंगी गावात मोठे तणावाचे वातावरण होते.सकाळपासून पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला होता.विशेष म्हणजे ठाणेदार रविंद्र शिंदे सह उपपोलिस निरीक्षक यांच्यासह सुमारे 40 लोकांचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याला कुठल्याही परिस्थितीत सरपंच पदावर विराजमान होऊ द्यायचे नाही हे भाजपच्या एका गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी करुन ठरविले आणि त्याचपध्दतीने निकाल सुध्दा लागला.निवडणुकीसाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले ,भाजप कार्यकर्ता तेजेंद्र हरिणखेडे यांच्यासह ग्रा.प.सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.