गडचिरोलीत शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी

0
8

गडचिरोली,  दि.२५: येथील शिवसेनेच्या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी होऊन प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचल्याची घटना काल(ता.२४) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार व शहरप्रमुख संतोष मारगोनवार यांच्यावर अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार हे आपल्या काही मित्रांसह विश्रामगृहात असताना शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष मारगोनवार तेथे गेले. मारगोनवार यांनी कात्रटवार यांना “जय महाराष्ट्र” म्हटले. येथूनच दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. काही क्षणातच मारगोनवार यांनी पोलिस ठाण्यात जाऊन कात्रटवार यांच्याविरुद्ध तक्रार केली. कात्रटवार यांनी आपणास मारहाण केल्याचे मारगोनवार यांनी तक्रारीत म्हटले. पुढे अरविंद कात्रटवार हेही ठाण्यात दाखल झाले. त्यांनी मारगोनवार यांनी दारु पिऊन आपणास मारहाण केल्याची तक्रार केली.