खरेदी-विक्री समितीवर राष्ट्रवादीची सत्ता : पारबता चांदेवार सभापती व पुस्तोडे उपसभापती

0
21

देवरी दि. २७ : येथील सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीच्या सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक सोमवारी (ता.२३) पार पडली.या समितीवर राष्ट्रवादीने कब्जा केला असून पारबता चांदेवार यांची सभापतीपदी तर भैयालाल पुस्तोडे यांची उपसभापती निवड झाली.
सहकारी शेतकरी खरेदी-विक्री समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, भाजपचे तीन तर काँग्रेसचे तीन सदस्य निवडून आले होते.यात राष्ट्रवादीकडून सेवासंस्था सदस्य भैयालाल पुस्तोडे, खिलवंत येळे, सर्वसाधारण सदस्य गोपाल तिवारी, ताराचंद मेश्राम, महिला सदस्य पारबता चांदेवार, इतर मागासवर्गीय सदस्य पवन कटकवार तर भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागासवर्ग सदस्य म्हणून द्वारका धरमगुळे निवडून आले. काँग्रेसकडून सर्वसाधारण सदस्य अशोक लंजे, अनुसूचित जाती-जमाती सदस्य भास्कर कोटांगले, महिला सदस्य अर्चना नरवरे निवडून आले.
भाजपकडून सर्वसाधारण सदस्य तुळशीराम गहाणे, झामसिंग येरणे, केवळराम बोधनकर निवडून आले.या १३ सदस्यांच्या कार्यकारिणीची निवड ही बिनविरोध झाली होती. दरम्यान सभापती, उपसभापती पदाकरिता सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली.यात सभापती पदाकरिता राष्ट्रवादीकडून पारबता चांदेवार, काँग्रेस-भाजप युतीकडून अर्चना नरवरे यांनी तसेच उपसभापती पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून भैयालाल पुस्तोडे, काँग्रेस-भाजप युतीकडून केवळराम बोधनकर यांनी अर्ज सादर केले होते. या निवडणुकीत पारबता चांदेवार यांना सात तर अर्चना नरवरे यांना सहा मते पडली.
तसेच भैयालाल पुस्तोडे यांना आठ तर केवळराम बोधनकर यांना पाच मते पडली. तथापि, पारबता चांदेवार यांना सभापती तर भैय्यालाल पुस्तोडे यांना उपसभापती म्हणून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी घोषित केले