फुट वेयरच्या गोदामाला आग ?

0
9

 गोंदिया,दि.9- /येथील कृष्णापुरा वाॅर्ड मधील राजू फुट वियरच्या तीन मंजली गोदामाला रात्री तीन वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. कृष्णापुरा वाॅर्ड हा रहिवासी परिसर आहे. तसेच येथील गल्ली सुद्धा अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवताना खूप त्रास सहन करावा लागला. fireraju1गोडाऊन मध्ये लागलेली आग एवढी मोठी होती की, गोडाऊनच्या भिंतीला देखील खूप मोठ्या भेगा पडल्या आहेत. आजू बाजू मध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरांच्या भिंती सुद्धा या आगीने प्रभावित झाल्या. त्यामुळे परीसरात खळबळ उडाली होती. आगीला आटोक्यात आणण्याकरिता फायर बिग्रेडच्या ९ गाड्या लागल्या. या आगीत राजू फुट वेयरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही कळू शकले नाही.नागरिकामध्ये मात्र गोंदिया शहरात जेव्हा केव्हा अशा आगीचे प्रकार विशेष करुन दुकानात घडतात तेव्हा विम्याची रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात.या गोदामात वास्तविक कितीचा माल होता हे मालकाशिवाय कुणालाच ठाऊक नसते.त्यातही या गोदामात आग लागल्यास ती विझविण्यासाठी पाईपलाईची सुध्दा व्यवस्था नव्हती.आग आटोक्यात आण्यासाठी गोंदिया,तुमसर ,अदानी प्रक्ल्प तिरोडा व बालाघाट येथील अग्नीशमक गाड्या बोलावण्यात आल्या होत्या.