‘पाकिस्तानशी चर्चा करता, मग राममंदिर का बांधत नाही?’

0
5

मुंबई – ‘अयोध्येत राममंदिर खरेच बनेल काय? यावर पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यसभेत मंदिरविरोधकांनी हंगामा करून कामकाज बंद पाडले.  प्रत्यक्ष अयोध्यानगरीत प्रभू श्रीरामही आता या विषयाकडे गांभीर्याने पाहात नसावेत. “ठेविले अनंते तैसेची राहावे”असे प्रजा म्हणते. त्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रभूंवरही हेच म्हणण्याची वेळ देशातील राजकारण्यांनी आणली आहे‘, असे म्हणत शिवसेनेने “सामना‘च्या अग्रलेखाद्वारे अयोध्येतील राममंदिराच्या मुद्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे, “अयोध्येत राममंदिरासाठी दगडविटांची नवी खेप आली व विटा तासण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे काही मंडळींचे म्हणणे आहे. आतापर्यंत इतक्‍या विटा तासल्या गेल्या आहेत की, देशात ठिकठिकाणी शंभर भव्य राममंदिरे उभी राहू शकतील, पण आपल्याला राममंदिर हवे आहे ते रामाच्या अयोध्या नगरीत. मात्र आज आपल्याच अयोध्येत प्रभू श्रीराम एक निर्वासित म्हणून तंबूरूपी मंदिरात वास्तव्य करून आहेत, याची राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. प्रभू श्रीरामाच्या मेहेरबानीने जे लोक सत्तापदे भोगत आहेत. त्या भोगवटाधारकांनी तरी प्रभू श्रीरामाचा हा वनवास संपवावा; पण रामाचे काय करायचे याचा निर्णय म्हणे देशाचे सर्वोच्च न्यायालय घेणार. जे न्यायालय गरीबांना झोपडी, बलात्कारित स्त्रीला न्याय, जनतेला सुरक्षा देऊ शकले नाही ते प्रभू श्रीरामाला हक्काचे मंदिररूपी घर देईल काय? हे श्रद्धेचे विषय आहेत व त्यात न्यायालयाचे काम नाही.‘ तसेच, ‘शेकडो निरपराध्यांचे रक्त सांडून, आमच्या जवानांची हजारो बलिदाने होऊनही हिंदुस्थान-पाकिस्तानात अत्यंत खेळीमेळीत चर्चा घडू शकते. किंबहुना तशी ती वर्षानुवर्षे सुरू आहे. मग राममंदिरासाठी जी अयोध्येची “शरयू‘ नदी अनेकदा लाल झाली त्या रक्ताचे मोल ठेवून खेळीमेळीच्या वातावरणात राममंदिराची निर्मिती का होऊ नये? हा प्रश्‍न अडचणीचा असला तरी चुकीचा नक्कीच नाही!‘ असेही अग्रलेखात म्हटले आहे. शकते. किंबहुना तशी ती वर्षानुवर्षे सुरू आहे. मग राममंदिरासाठी जी अयोध्येची “शरयू‘ नदी अनेकदा लाल झाली त्या रक्ताचे मोल ठेवून खेळीमेळीच्या वातावरणात राममंदिराची निर्मिती का होऊ नये? हा प्रश्‍न अडचणीचा असला तरी चुकीचा नक्कीच नाही!‘ असेही अग्रलेखात म्हटले आहे.