माजी मुख्‍यमंत्री अजीत जोगींचे पुत्र आमदार अमित यांना कॉंग्रेसमधून काढले

0
9
रायपूर – छत्‍तीसगडचे माजी मुखमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांना कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले आहे. अंतागड विधानसभा मतदार संघात झालेल्‍या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्‍या उमेदवाराची उमेदवारी मागे घेण्‍यासाठी त्‍यांनी आर्थिक देवाण-घेवाण केल्‍याचा आरोप आहे. अमित हे मरवाही विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत.
– छत्‍तीसगडच्‍या कॉंग्रेस नेत्‍यांची या संदर्भात बैठक सुरू असून, पक्षाचे राज्‍याध्‍यक्ष भुपेश बघेल आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते टी.एस. सिंह देव दिल्लीला जाणार आहेत. त्‍या ठिकाणी ते पक्षांच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांना या बाबत पुराव्‍याच्‍या टेप देणार आहेत.
– पक्षांच्‍या वरिष्‍ठांकडून आता अजीत जोगी यांच्‍यावरही कारवाई केली जाईल, असे सांगितले जात आहे