भारतीय विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी गठित

0
17

गोंदिया  दि.११ : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, गोंदियाचे माजी आ. रमेश कुथे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजकुमार कुथे यांच्या मार्गदर्शनात भारतीय विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे.
यात तालुका संघटक म्हणून कमलेश सुखलाल बनकर, शहर संघटक राहुल राजेंद्र नागपुरे, शहर सरचिटणीस दिनेश हरिश्‍चंद्र मस्के, उपशहर संघटक रितेश सुनेश चोरनेले, उपशहर संघटक गोविंदा राजेश मिश्रा, उपशहर संघटक रोहित बुधराम भारद्वार, उपशहर संघटक निश्‍चल जितेंद्र तुरकर यांचा समावेश आहे.
शिवसेना जिल्हा कार्यालयात सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच पुष्पगुच्छ व भगवा दुपट्टा देऊन समस्त नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी पक्ष गतीविधीसंबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी हिमांशू कुथे, गजेंद्र फुंडे, पुरुषोत्तम ठाकरे, राजू मुरकुटे, विकास नागरीकर, प्रशांत गणवीर, सौरभ शर्मा, रौनक मिश्रा, दीपक मिश्रा, पंकज चौरागडे, प्रशांत गहलोद, मोनू मानकर, उमेश बघेल, संदीप तुरकर, संदीप भीमटे, सोहन शेंद्रे, अमन हरिणखेडे, कान्हा चौधरी, मोहीत भावनानी, मनोज बुधवानी, सुदर्शन वलेचा, रुपेश सोनेकर, मनिष बोरसरे, येशू चोर्ज, हर्ष बागडे, शिवसेना, विद्यार्थी सेना, युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठय़ा संख्येत उपस्थित होते.