गोंधळ घालत भाजपानेच ७ वर्ष रोखलं जीएसटी विधेयक – राहुल गांधी

0
10
वृत्तसंस्था
मुंबई दि. १६- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी माझ्याकडे आले नव्हते, तर ते त्यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी भेटीला आले होते. गेल्या सात वर्षांपासून भाजप जीएसटी मंजूर होऊ देत नाही, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.
 
मुंबईतील एनएमआयएमएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.

काँग्रेसचा जीएसटी विधेयकाला विरोध नाही, भाजपामध्येच जीएसटीच्या मुद्यावर मतभेद आहेत. जीएसटीमुळे नागरिकांवर कराचा अधिक बोजा पडू नये असे आम्हाला वाटते. या विधेयकातील तीन मुद्यावरून आमच्यात व भाजपामध्ये मतभेद आहेत, पण आम्ही सांगितलेले बदल वा दुरूस्ती करण्यास भाजपाचा विरोध आहे, असे राहुल म्हणाले.
यावेळी त्यांनी असहिष्णूतेच्या मुद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येणारी स्टार्टअप योजना आणि असहिष्णुता हे दोन्ही मुद्दे एकत्रपणे येऊ शकत नाही, असेही मत त्यांनी मांडले.