माजी आमदार हेमंत पटले भाजपाच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी

0
13

गोंदिया, दि.१७ : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार हेमंत पटले यांची निवड करण्यात आली.आज १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पक्षाच्या सभेत जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक धोटे, माजी जि. प. अध्यक्ष, नागपूर, यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरूवात केली. यावेळी जिल्हाध्यक्षपदासाठी सूचक म्हणून जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी माजी आमदार हेमंत पटले यांचे नाव सुचविले. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी अनुमोदन दिले. यावर निवडणूक अधिकारी धोटे यांनी सर्वसंमतीने जिल्हाध्यक्षपदी हेमंत पटले यांची निवड केली. जिल्हाध्यक्ष पटले यांचे सर्व पदाधिकाèयांनी अभिनंदन केले. विशेष म्हणजे, माजी आमदार हेमंत पटले हे दुसèयांदा भारतीय जनता पक्षाचे गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष झाले आहेत.
यावेळी प्रामुख्याने पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, ज्येष्ठ नेते माजी खासदार डाॅ. खुशाल बोपचे, माजी आमदार खोमेश्वर रहागंडाले,दयाराम कापगते, भजनदास वैद्य, भेरqसग नागपुरे, राधेश्याम अग्रवाल, राकेश शर्मा, अशोक इंगळे, नेतराम कटरे, सीता रहांगडाले, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि. प. उपाध्यक्ष रचना गहाणे, सभापती छाया दसरे, पं. स. सभापती दिलीप चौधरी, विरेंद्र अंजनकर, दीपक कदम, भाउराव उके,रेखलाल टेंभरे, नवनियुक्त मंडळ अध्यक्ष अ‍ॅड. येसुलाल उपराडे आमगाव, डॉ. लक्ष्मण भगत गोरेगाव, प्रमोद संगीडवार देवरी, उमाकांत ढेंगे अर्जुनी मोरगाव, विजय बिसेन सडक अर्जुनी, परसराम फुंडे सालेकसा, भाउराव कठाणे तिरोडा, छत्रपाल तुरकर गोंदिया ग्रामीण मंडळ, सलाम शेख तिरोडा शहर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी यावेळी, पक्षाने दिलेली जबाबदारी ही मोठी असून सर्वांच्या सहकार्याने पक्ष बळकट करण्याचा निर्धार केला. संचालन विरेंद्र अंजनकर यांनी केले.