भंडारा भाजप जिल्हाध्यक्षपदी तारीक कुरेशी

0
10
भंडारा, दि.१७ : भंडारा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी  पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी तारीक कुरेशी यांची निवड करण्यात आली.आज १७ जानेवारी रोजी  आयोजित पक्षाच्या सभेत जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक धोटे यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरूवात केली. यावेळी जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी राहिलेले तारीक कुरेशी यांची नाव सुचविले. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी अनुमोदन दिले. यावर निवडणूक अधिकारी धोटे यांनी सर्वसंमतीने जिल्हाध्यक्षपदी तारीक कुरेशी यांच्या नावाची घोषणा केली. वि्द्यमान जिल्हाध्यक्ष व खासदार नाना पटोले यांनी तारीक कुरेशी यांचे स्वागत करुन अभिनंदन केले. यावेळी पक्षाचे आमदार बाळा काशीवार,चरण वाघमारे,एड.रामचंद्र अवसारे,अॅड.प्रकाश मालगाये,माजी खासदार शिशुपाल पटले,कलाम शेख यांच्यासह इतर वरिष्ठ पदाधिकारी व नेते उपस्थित होते.