२०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून लोधी खासदार पाठविणे हाच लक्ष्य- साधना भारती

0
16

गोंदिया,दि.१७-लोधी समाजाच्या युवा नेत्या आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय स्टार प्रचारक असलेल्या विश्वकन्या साधना भारती यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एक तर लोधी समाजाचा खासदार पाठविणे आपला लक्ष आहे.सोबतच लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्यासाठी आपला समाजाला पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती गोंदिया येथे लोधी समाज युवक युवती परिचय मेळाव्याकरिता आल्या असता सांगितले.सुश्री साधना भारती म्हणाल्या की,विचार करण्याची भूमिका सकारात्मक असायला हवी.आपण आजपर्यंत काँग्रेस पक्षासाठी खूप काही काम केले.परंतु आता समाजासाठी सुध्दा आपण वेळ देणार असून गेल्या आठवड्यात बालाघाटला आणि आज गोंदियाला पहिल्यांदाच आल्याचे सांगत समाजाला आपल्याकडून खूप अपेक्षा असल्याने समाजाच्या न्याय हक्कासाठी आपणही संघर्ष करायला तयार असल्याचे म्हणाल्या.गोंदिया ही हृद्यभूमी असल्याने येथूनच आपल्या समाजाच्या उत्थानाची नवी दिशा ठरणार आहे.लोधी समाज हा खूप मोठा समाज असून आपण केलेल्या अभ्यास व संशोधनामध्ये अफगाणिस्तान,पाकिस्तान,इराण व आफ्रिकेसारख्या देशातही आपला लोधी समाज अस्तित्वात असल्याचे सांगत त्याठिकाणी मुसलमान झाल्याचेही त्या म्हणाल्या.महाराष्ट्रात आपण ओबीसीमध्ये असलो तरी महाराष्टातून केंद्राच्या यादीत आपण ओबीसीत नसल्याने अनेक शैक्षणिक सुविधासह इतर योजनेपासून वंचित राहावे लागते.त्यासाठी केंद्रसरकारला येत्या १६ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात येत आहे.त्या आधी लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत सामावून न घेतल्यास दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलनाला सुरवात करून जोपर्यंत सरकार लोधी समाजाला ओबीसीमध्ये सामावून घेणार नाही,तोपर्यंत हा आंदोलन सुरूच राहील असेही त्या म्हणाल्या.सोबतच गोंदियानजीकच्या बिरसी विमानतळाला विरांगणा राणी अवंतीबाई चे नाव देण्याची मागणी समाजाची असून ती मागणी केंद्रीय मंत्री सुश्री उमा भारती यांच्यापर्यंत पोचवून त्यांनाही यासह ओबीसीच्या मुद्यावर सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती करणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले.यावेळी साधना भारतीचे वडील जोगेश राजपूत,छत्तीसगड लोधी समाज अध्यक्ष सुरेश सुलाखे,सचिव कैलास दमाहे,अ‍ॅड.कंचनवाला,मुंबईचे नरेश लोध,प्रदीप वर्मा,लोधी समाज महाराष्ट्र ओबीसी आघाडीचे अध्यक्ष राजीव ठकरेले,आशिष नागपूरे,गौरव नागपूरे,जितेंद्र नागपूरे,सुरेश लिल्हारे,उमेश बांभरे,नंदकिशोर बिरनवार,सुनील नागपूरे,शिव नागपूरे आदी समाज बांधव उपस्थित होते.