नितीन गडकरींचा गौप्यस्फोट; म्हणाले – विहिरीत उडी घेईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही

0
42

मला विद्यार्थी दशेत काम करत असताना उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली होती. यावेळी गडकरींनी जिचकरांना सांगितले होते की मी विहिरीत उडी घेईल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही हा जुना किस्सा काल नितीन गडकरी यांनी नागपुरात उद्योजकांच्या एका समिटला संबोधित करताना सांगितला.

गडकरींनी किस्सा सांगत संपवली चर्चा

गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळातून काढण्यात आले आहे. यावेळी राजकीय वर्तळात सुरू असलेली गडकरींच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिला आहे. ते नाराज असल्याच्या चर्चा ही सुरू होत्या. यानंतर त्यांची गेल्या काही दिवसांतील भाषणे पाहिली तर ते सध्याच्या राजकारणाला कंटाळले असल्याचे जाणवत होते यात ते म्हणाले की, आजकाल राजकारण समाजकल्याणासाठी राहिले नसून सत्तेसाठी असल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर नितीन गडकरी पक्षातून बाहेर पडणार का? अशी चर्चा होती. मात्र, एकप्रकारे गडकरींनी पुन्हा एकदा हा किस्सा सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नेमके काय म्हणाले गडकरी?

मी विद्यार्थी दशेत काम करत असताना मला श्रीकांत जिचकरांनी उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असे म्हटले होते, पण मी त्यांना म्हणालो की, विहिरीत उडी घेईल; पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, काँग्रेसची विचारधारा मला मान्य नाही. राजकीय विषयावर बोलताना गडकरींनी युवा उद्योजकांना सल्लाही दिला आहे. यात त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे, असेही म्हटलं जात आहे. गडकरी म्हणाले, की ‘कोणाचे वाईट दिवस असो किंवा चांगले दिवस असो. एकदा कोणाचा हात धरला की त्याची साथ सोडू नका. उगवत्या सूर्याची पूजा करू नका. युज अ‍ॅण्ड थ्रो पॉलिसी चांगली नाही, असे नितीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.