भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी सेलच्या जिल्हा महासचिवपदी बालकदास ठवकर

0
7

तुमसर- तालुक्यातील खापा येथिल अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीचे सदस्य बालकदास शिवकिसन ठवकर यांची नुकतीच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या मान्यतेनुसार ओबीसी विभागचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंग यादव यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या निर्देशानुसार भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई, व भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शंकर राऊत यांच्या शिफारसी नुसार भंडारा जिल्हा ओबीसी सेल काँग्रेस कमेटीच्या जिल्हा महासचिवपदी
बालकदास ठवकर यांची नुकतीच पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली.

भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी सेलचे नवनियुक्त जिल्हा महासचिव बालकदास ठवकर यांनी आपल्या निवडीचे श्रेय अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शंकर राऊत, यांना दिले.

तर त्यांच्या निवडीबद्दल भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शंकर राऊत, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुनिल केदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे माजी सचिव प्रमोद तितीरमारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या महीला प्रदेश सचिव सिमा भुरे, भंडारा जिल्हा महीला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष जयश्री बोरकर, जि. प अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जि .प सभापती रमेश पारधी, कलाम शेख, पंचायत समिती उपसभापती हिरालाल नागपुरे, जि प सदस्य देवा ईलमे, कृष्णकांत बघेल,माजी नगराध्यक्ष अमर रगडे, माजी नगरसेवक बाळा ठाकुर, शिव बोरकर, पंचायत समिती सदस्य नरेंद्र गेडाम, शहर अध्यक्ष कान्हा बावनकर, शुभम गभने, युवक काँग्रेस अध्यक्ष राकेश कारेमोरे, युवक काँग्रेस तुमसर मोहाडी विधानसभा अध्यक्ष प्रफुल बिसने, महीला तालूका अध्यक्ष सिमा बडवाईक, प्रफुल वराडे, राजकमल तुमसरे, आदींनी अभिनंदन केले.