पदवीधर मतदार नोंदणीत प्रशासनाची जबाबदारी मोठी – विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे

0
10

यवतमाळ, दि8 :  इतर निवडणुकांची मतदार यादी तयार होताना मतदार स्वतःहून नाव नोंदणी करतात. मात्र पदवीधर मतदार संघाच्या  मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पदवीधर मतदार स्वतःहून पुढे येत नाहीत. त्यामुळे यात प्रशासनाची जबाबदारी मोठी असून एकही मतदार यादीच्या बाहेर राहणार नाही यासाठी सक्रियपणे मतदार नोंदणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात पदवीधर मतदार संघाच्या मतदान नोंदणीचा आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहल कणीचे,  तसेच इतर प्राधिकृत अधिकारी उपस्थित होते तर दृकश्राव्य पद्धतिद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी सहभागी झाले होते.   ८ ते २२ नोव्हेंबर पर्यंत पदवीधर मतदार  अर्जांची छाननी आणि छपाईसाठी राखीव ठेवलेला असून 23 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

त्यानंतर २४ ते ९ डिसेंबर पर्यंत पुन्हा पदवीधर मतदार संघासाठी मतदारांना नाव नोंदणी करता येईल. त्यामुळे पात्र मतदारांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी यासाठी प्रशासनाने अधिक क्रियाशिल होण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादित केली. पदवीधरांची संख्या सातत्याने वाढत राहते.  तसेच ज्या जिल्ह्यातील उमेदवार या निवडणुकीसाठी उभा असतो त्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी होते, तर इतर जिल्ह्यात त्यामानाने मतदारांची संख्या कमी असते. अकोला जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्याने चांगली मतदार नोंदणी केली असल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

मागील निवडणुकिवेळी ३२ हजार मतदार नोंदणी झाली होती, यावेळी ६ नोव्हेंबरपर्यंत १५ हजार ४६० मतदार नोंदणी झाली असून आज सुमारे ५ हजार नोंदणी अपेक्षित आहे. तसेच २४ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधित ४० हजार पर्यंत मतदार नोंदणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

समाधान शिबिर घेण्याची पालकंमंत्री संजय राठोड यांची संकल्पना चांगली असुन यामाध्यमातुन सामान्य जनतेचे प्रश्न सोडविले जातात. यासाठी प्रशसनाने सक्रिय सहभाग द्यावा असे सांगितले.

अतिवृष्टीची मदत वाटप बाबत आढावा घेतांना विभागिय आयुक्तांनी यावर्षी  जिल्ह्यात शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासुन वंचित राहणार  नाही याबाबत दक्ष राहण्याच्या सुचना केल्यात.

बैठकीनंतर विभागिय आयुक्तांनी मुरझडी कोलाम पोड आणि हिवरी येथिल आश्रमशाळेला भेट दिली. मुरझडी येथे सामुहिक वनहक्क दाव्याचे वाटप केले. तसेच आदिवासिंना याबाबत येणा-या अडचणी समजुन घेतल्या. हिवरी येथिल आदिवासी आश्रम शाळेला भेट देऊन जलशक्ती मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामाचीही पाहणी केली.