काँग्रेसचे Tweet: सावरकर ‘नकली’ देशभक्त

0
12

वृत्तसंस्था

नवी दिल्ली,दि.7-काँग्रेसने आज केलेल्या एका ट्विटने भाजप-काँग्रेस यांच्यात पुन्हा शाब्दिक लढाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंटवर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘नकली’ देशभक्त म्हटले आहे, तर त्याचवेळी चंद्रशेखर आझाद यांना ‘असली’ देशभक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर असली आणि नकली देशभक्त असा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. सावरकरांच्या फोटोवर ‘नकली’ लिहिले आहे. तर फोटोच्या खालच्या बाजूला, ‘सहा वेळा इंग्रजांकडे दयेची भीक मागितली’ असे लिहिले आहे. त्यांच्याच बाजूला ‘असली’ देशभक्त म्हणून चंद्रशेर आझाद यांचा फोटो आहे. त्यावर लिहिले आहे, ‘शेवटच्या क्षणापर्यंत लढले आणि प्राणांची अहूती दिली.’

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी (2 मार्च) लोकसभेतील त्यांच्या भाषणात ‘तुमचे सावरकर’ असा उल्लेख केला होता, तेव्हा भाजप सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला होता. राहुल गांधी म्हणाले होते, ‘गांधी आमचे, सावरकर तुमचे.’