अहेरी जवळील दोडेपल्लीत चितळाची शिकार

0
10

अहेरी,दि..७: तालुक्यातील दोडेपल्ली येथे चितळाची अवैध शिकार करुन त्याचे मांस विकण्याच्या प्रयत्नात असताना वनाधिकाऱ्यांनी काल(६)रात्री धाड घातली. वनाधिकाऱ्यांनी मांस व अवजारे जप्त केली. मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.

अहेरीपासुन चार किमी.अंतरावर असलेल्या अहेरी वनपरिक्षेत्रांतर्गत रामपुर बिटातील दोडेपल्ली गावात चितळाची शिकार करुन त्याचे मांस विकणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी प्रभाकर आत्राम यांच्या नेतृत्वात वनकर्मचारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दोडेपल्ली गावात पोहचले. यावेळी त्यांना आनंदराव तोर्रेम यांच्या घरी चितळ कापत असल्याचे दिसून आले. मात्र वनाधिकाऱ्यांना पाहताच आरोपी पसार झाले. वनाधिकाऱ्यांनी चितळाचे मांस व अवजारे जप्त केली. वनपाल आर.एस. मडावी,एस. घुटे, जी.एल.नवघरे, एस. एस. गुरुनुले, एन.ए. कुमरे, एन. आर. सिडाम यांनी ही कारवाई केली.