मुंबईतील पहिली टेस्ट टयुब बेबी बनली आई

0
14
वृत्तसंस्था
मुंबई, दि. ७ – मुंबईत २९ वर्षांपूर्वी टेस्ट टयुब बेबी तंत्रज्ञानाने जन्माला आलेली पहिली मुलगी आज आई बनली आहे.  सहा ऑगस्ट १९८६ रोजी हर्षा चावडा या पहिल्या टेस्ट टयुब बेबीचा मुंबईत जन्म झाला होता. २९ वर्षाच्या हर्षाने सोमवारी सकाळी जसलोक रुग्णालयात एका सुंदर मुलाला जन्म दिला.
स्त्रीरोगतज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा आणि डॉ. कुसूम झवेरी यांनी हर्षाची प्रसूती केली. १९८६ साली हर्षाच्या जन्माच्यावेळीही डॉ. इंदिरा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. माझ्याबाबत अपवादात्मक असे काही नाही. मी सुद्धा दुस-यांसारखीच सामान्य आहे. पण मला नेहमीच मी विशेष असल्याचे जाणवते असे हर्षाने २०११ साली २५ व्या वाढदिवसाला डिएनएशी बोलताना सांगितले होते.