गोंदिया शहर भाजप अध्यक्षपदी सुनिल केलनका

0
8

गोंदिया,दि.10-गेल्या महिन्याभरापासून गोंदिया शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर कुणाची निवड होते याकडे शहरातील अनेकांचे लक्ष लागले होते.अाज गुरुवारला अखेर भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले यांनी तर्कविर्तकांना थांबा देत गोंदिया शहर भाजपच्या अध्यक्षपदावर युवा नेतृत्व आणि सर्वांशी जुळवून घेणारे विद्यमान भाजपचे महामंत्री सुनिल केलनका यांची नियुक्ती केली आहे.केलनका यांना आज भाजपच्या कार्यालयात त्यासंबधीचे पत्र देण्यात आले आहे.मावळते अध्यक्ष भरत क्षत्रिय यांच्या मनमिळावू स्वभावामूळे त्यांचीही कारकिर्द चांगली राहिली.केलनका यांना येत्या काळात होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.केलनका यांनी आपल्या निवडीचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,खासदार नाना पटोले,अशोक नेते,सामाजिक न्याय मंत्री रा.सु.बडोले,जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,आमदार विजय रहागंडाले,संजय पुराम,माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी आमदार केशवराव मानकर,खोमेश्वर रहागंडाले,दयाराम कापगते,अशोक इंगळे आदींना दिले आहे.केलनका यांची शहर भाजपअध्यक्षपदी निवड झाल्याबद्ल किशोर हालानी,कुशल अग्रवाल,भाऊराव उके,धनजंय वैद्य आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.