न.प. सभापतींची निवडणूक आज

0
9

गोंदिया  दि.११: नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींचा कार्यकाळ शुक्रवारी (दि.११) पूर्ण होत असल्याने याच दिवशी सभापतींची निवडणूक घेतली जात आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य संख्याबळ जास्त असल्याने सभापतींची पदे यंदाही त्यांच्याच झोळीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगर परिषदेत सत्तापालट होऊन भारतीय जनता पक्षाकडे सत्ता गेली. मात्र निष्काषीत करण्यात आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व परत आल्याने संख्याबळाची आकडेवारी बदलून गेली. परिणामी अध्यक्ष व उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे असले तरी विषय समितींचे सभापतीपद मात्रआजही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच आहे.
आता भारतीय जनता पक्षाचे शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सदस्य अनिल पांडे यांचा मृत्यू झाल्याने भाजपचा एक सदस्य कमी झाला असून त्यांची आकडेवारी १६ वरून १५ वर आली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ११, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ६, लोकतांत्रीक गठबंधनचे २, शिवसेना ३ व अपक्ष २ अशी सदस्य संख्या पालिकेत आहे. यामुळेच पालिकेतील सभापतीपद राष्ट्रवादी व कॉंग्रेसकडे आहे.