अनिल गोटेंचे भुजबळांना पत्र

0
12

मुंबई – तेलगी प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना मला  आत टाकलेत, आता आर्थर रोड जेलमध्ये राहताना तुम्हालाही कळेल,‘ असे पत्र धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पाठविले आहे. 

महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे तख्त उलथून टाकण्यासाठी आमदार या नात्याने मी वेगळ्या गटात सहभागी झालो, याची किंमत म्हणून भुजबळ यांनी आपल्याला तेलगी प्रकरणात गोवले होते. तेलगी माझा मित्र होता; पण मी त्याच्या कोणत्याही व्यवसायात नव्हतो, हे स्पष्ट केल्यानंतरही केवळ सुडाचे राजकारण म्हणून माझ्यावर कारवाई झाली, आता भुजबळ स्वत:च तुरुंगात गेले असल्याचे गोटे यांनी या पत्रात नमूद केले आहे. तत्कालीन गृहमंत्री या नात्याने भुजबळ यांनी माझ्यावर खोटे आरोप ठेवून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. यंत्रणा राबवली, माझ्या राजकीय मस्तीची चूक भोगायला लावू नका, अशी विनवणी केल्यानंतरही मलाच नव्हे; तर माझ्या मुलालाही भुजबळ यांनी अडचणीत आणले. हा प्रकार अत्यंत हीन दर्जाचा होता. मैत्री आणि गुन्हे याची सांगड घालण्याचा प्रयत्न अत्यंत निंद्य होता.