शेतकऱ्यांना कर्जबाजारी होऊ देणार नाही- देवेंद्र फडणवीस

0
12

नाशिक : शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊ नये, असे आमचे म्हणणे नाही.  शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी  प्रयत्न करण्यार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीचे उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यापूर्वीच्या सरकारने कर्जमाफी केल्यावर शेतकरी कर्जबाजारी झाले असल्याचेही ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे अध्यक्षस्थानी होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या अजेंड्यावर शेतकरी असल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे. दुष्काळामध्ये शेतीच्या योजनांच्या “ब्रॅंडींग‘ करण्यासाठी योजना गावापर्यंत पोचवण्याची तयारी पक्षाची आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या दीड वर्षात सरकारने चांगले काम केले असल्याचे सांगत हे काम लोकांपर्यंत न्यावे लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच येत्या पाच वर्षांमध्ये राज्याच्या विकासात आमुलाग्र बदल करण्याचे ध्येय सरकारने निश्‍चित केले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.