कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे: राजेंद्र पटले यांचे प्रतिपादन

0
13

भंडारा : पक्ष म्हटले की काम करण्याची जिद्द बाळगावी लागते. शिवसेना कामाला प्राधान्य देणारा पक्ष आहे. येणार्‍या काळात शिवसेना कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे जेणेकरुन जनमानसात प्रतिमा उंचावण्याचे कार्य जोमाने होईल असे प्रतिपादन शिवसेनाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी केले.भंडारा येथे गुरुवारी आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांना बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मंचावर माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, पवनीच्या नगराध्यक्षा रजनी मोटघरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत एंचीलवार, डॉ. अजय तुमसरे, संजय रेहपाडे, शेखर कोतपल्लीवार, ललीत बोंद्रे, विजय काटेखाये, सुरेश धुर्वे, अनिल गायधने, राजु ब्राम्हणकर, नितीन साकुरे, नरेश बावणकर आदी उपस्थित होते. यावेळी राजेंद्र पटले म्हणाले, शिवसैनिकांनी जनमानसांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या मार्गी लावण्याची प्रयत्न करावे.
यावेळी पटले यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात उपजिल्हाप्रमुख म्हणून विजय काटेखाये (प्रशासकीय), संजय रेहपाडे (संघटक), सुरेश धुर्वे (सहकार), यशवंत वंजारी (निवडणुक), अँड. वसंत एंचिलवार (प्रशासकीय), भंडारा तालुका प्रमुख अनिल गायधने, पवनी तालुका प्रमुख राजु ब्राम्हणकर, भंडारा शहर प्रमुख नितीन साकुरे तर पवनी शहर प्रमुख म्हणून नरेश बावणकर यांनी निवडकरण्यात आली आहे.