ओबीसींचे शासनाकडे निवेदन

0
7

वणी : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ओबिसी समाजाबद्दल असमाजिक वक्तव्य केल्याबद्दल ओबिसी समाजाची जाहीर माफी मागावी, यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
नायब तहसीलदार विजय मत्ते यांनी निवेदन स्विकारले. निवेदनामध्ये ओबिसी समाजासाठी काही मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ओबिसींची जनसंख्या जाहीर करून समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती १00 टक्के देण्यात यावी, ओबिसींचे आरक्षण कमी केलेल्या चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, ठाणे, नाशिक व पालघर जिल्ह्यात पूर्ववत १९ टक्के आरक्षण सुरू करावे, प्रत्येक जिल्ह्यात ओबिसींच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे, ओबिसी शेतकर्‍यांना १00 टक्के अनुदानावर योजना सुरू कराव्या, ओबिसी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग मोफत सुरू करावे, पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, शेतकर्‍यांना वनहक्क पट्टय़ासाठी लावलेली तीन पिढय़ांची अट रद्द करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना ओबिसी कृती समितीचे संयोजक विजय पिदुरकर, विजय गारघाटे, गणपत लेडांगे, डॉ.भाऊराव कावडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.