गडचिरोली – चिमूर लोकसभेची जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी नेते आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षश्रेष्ठी पुढे आग्रह

0
11

गडचिरोली:: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय टिळक भवन दादर मुंबई येथे “लोकसभा निवडणूक 2024 आढावा बैठक” प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सदर सभेला प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, विधिमंडळ पक्षनेता बाळासाहेब थोरात, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, सह प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव आशिष दुवा व सोनम पटेल, माजी खासदार मारोतरावजी कोवासे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, बसवराज पाटील तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
टिळक भवन मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीबाबत वरिष्ठांना माहिती दिली सोबतच गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून वर्तमान परिस्थितीतही स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमधील निवडून आलेल्या सदस्यांची संख्या पाहता काँग्रेस पक्ष वरचढ ठरत असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी असा आग्रह उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकसुराने वरिष्ठान पुढे धरला.
यावेळी वरिष्ठांनी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र हा काँग्रेस कोट्यातच राहील असे आस्वस्थ केले व आगामी निवडणुका लक्षात घेत जिल्हा, तालुका आणि बूथ स्तरावरील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही भुलथापाना बळी ण पडता अधिक जोमाने कामाला लागा सामान्यतील सामान्य नागरिकांपर्यंत काँग्रेसचे विचार व कार्य पोहोचवा अश्या सूचना केलेल्या आहेत.
या बैठकीला गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव माजी आमदार अविनाश वारजूकर, आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आमदार सहसराम कोरोटे, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, विश्वजीत कोवासे, जेसा भाई मोटवानी, सतीश वारजूकर, मुस्ताक हकीम, मनोहर पाटील पोरेट्टी, वामनराव सावसाकडे, लॉरेन्स गेडाम, छगन शेडमाके, अब्दुल भाई पंजवानी, सुनील चटगुलवार, अनिल कोठारे, नितेश राठोड, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना काळे, मोतीराम पिहिदे, विजय भाऊ गावंडे, प्रमोद भाऊ चौधरी, प्रदेश सचिव पी.जी. कटरे, प्रदेश सचिव अमर वराडे, संपत सोनी हे सहभागी झाले.