पालकमंत्री  जुन्याचे नवे करण्यात आघाडीवर-मनोहर चंद्रिकापूरे

0
14

गोरेगाव तहसिल व पंचायत समितीवर धडकला राष्ट्रवादीचा मोर्चा
गोरेगाव, दि. २९ : आघाडीच्या सत्ताकाळात मंजूर करण्यात आलेल्या योजना जिल्ह्याचे पालकमंत्री जाहिरातींव्दारे आम्ही करीत आहोत असे सांगत आहेत. परंतु,  त्याचे विकासकामाकडे दूर्लक्ष असून वादळी वारा आणि पावसाने झालेले नुकसानाची पाहणी करण्याकरिता त्यांच्याकडे वेळ नाही. केवळ जुन्याचे नवे करण्याचे काम पालकमंत्री राजकुमार बडोले आणि त्यांचे शासन करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मनोहर चंद्रीकापुरे यांनी केला.
राष्टवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने शेतकèयांच्या विविध मांगण्यांना घेवून येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयावर आज(ता. २९) मोर्चा काढण्यात आला. यावेळी पक्षातील कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या शेतकèयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिलीप बनसोड, विनोद हरिणखेडे, राजलक्ष्मी तुरकर, गंगाधर परशुरामकर, ललीता चौरागडे, डुमेश्वर चौरागडे,  केवलराम बघेले, किशोर तरोणे, कमलेश बारेवार, अनीता तुरकर, के के डोंगरे,रुस्तम येडे,बाबा बहेकार,बाबा बोपचे,जगनजी पटले,महेंद्र चौधरी,प्रदिप जैन,रजनी बिसेन,रामेश्वर हरिणखेडे,पुजा जांभूळकर,श्रीप्रकाश रहागंडाले ,देवीलाल पटले,रंजू अगडे,सोमेश रहागंडाले आदी उपस्थित होते. मनोहर चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, रमाई घरकुल योजनेत लाभाथ्र्यांना बिपीएलची अट ठेवण्यात आली नाही. असे असताना देखील ती अट लाभाथ्र्यांवर लादण्यात येत आहे. परिणामी अनेक लाभार्थी पात्र असून देखील योजनेच्या लाभापासून त्यांना वंचीत राहावे लागत आहे. यावेळी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, नायबतहसिलदार एन. एम. वेदी यांना देण्यात आले. संचालन सोमेश रहांगडाले यांनी केले. आभार डॉ. श्रीप्रकाश रहांगडाले यांनी मानले.