जिल्हा परिषदेच्या सत्तेतून भाजप पडणार बाहेर?सीएम दरबारात सुरू चर्चा

0
12

बेरार टाईम्स एक्सक्लुजीव
गोंदिया-गेल्या वर्षभरापूर्वी गोंदिया जिल्हा परिषदेत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमधील युती संपुष्टात येण्याची तयारी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.काँग्रेसने निव्वळ आपल्या पक्षाला अध्यक्षपद मिळावे यासाठी भाजपशी हातमिळवणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी खेळली होती.अखेरपर्यंत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला धुडकावत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या स्वार्थासाठी भाजपसोबत युती केल्याचे स्पष्ट झाले आहे.त्या युतीमध्ये जिल्हा परिषदेच्या सत्तेत आता यापुढे सहभागी व्हायचे नाही असा ठाम निर्धार भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या युती संदर्भाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेवटी जिल्ह्यातील आमदार,मंत्री व पक्षाचे जिल्हाध्यक्ष ,तसेच पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेतील असे ठरविण्यात आले.त्यानुसार सोमवारला (दि.१६) मुंबई येते सायकांळी बैठक घेण्यात आली.त्या बैठकीत युती तोडण्यावर चर्चा सुरु झाली असून युती तुटणे पक्के झाल्याची चर्चा आहे.त्यानंतर विरोधात बसायचे की कुणासोबत सत्तेत जायचे यावर नंतर चर्चा होईल असेही बोलले जात आहे.
यानुसार येत्या एक दोन दिवसात जिल्हा परिषदेच्या सत्तेतून भाजप बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झाले असून बहुतांश जि.प.सदस्य ,कार्यकर्ते,पदाधिकारी दबक्या आवाजात याची पुष्टी करीत आहेत.सोबतच या बैठकित शिव शर्मा यांना मदत कसे करता येईल यावरही चर्चा करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु असून भाजपसोबतच बजरंग दल,विहीपच्या काही लोकांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे आजकल भाजपच्या जुन्या वरिष्ठ नेत्यांना मात्र विश्वासात घेतले जात नसल्याचीही ओरड सुरु झाली आहे.त्याचा फटका भविष्यात पक्षाला बसू शकतो असेही बोलले जात आहे.भाजपमध्ये राहून काम केलेल्या अनेक माजी आमदार,खासदार व माजी जिल्हाध्यक्षांना आजही कुणी विचारत नाही,परंतु एक दोन महिन्यापुर्वी पदावरुन उतरलेल्यानच भाजप पक्ष समजतो काय बाकीच्यांना समजत नाही काय अशा वावड्याही सुरु झाल्या आहेत.
पूर्व विदर्भाचे संघटक उपेंद्र कोटेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार अग्रवाल यांनी भाजपचे नगरसेवक शिव शर्मा यांनी केलेल्या हल्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.मारहाणीचा निषेध पण करण्यात आला.परंतु भाजपच्या नगरसेवकाकडून मार खाल्यानंतरही आणि त्यातच काँग्रेसचे वरिष्ठ आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निषेध मोच्र्यात भाजपशी युती करून सापाला बळ दिल्याचे जाहीर उल्लेख केल्यानंतरही त्या मंचावरून अग्रवाल यांनी जि.प.मधील युती तोडण्याची घोषणा केली नाही.यावरून एकीकडे भाजपच्या नगरसेवकाने आपल्याला मारहाण केली म्हणून ओरड करीत भाजपला बदनामही करायचे आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये मात्र सत्तेत सहभागी राहून आपला प्रभाव कायम ठेवायचा ही भूमिका भाजपल्या भविष्यातील राजकारणासाठी धोक्याची घंटा असल्याची जाणीव होताच काँग्रेसच्या आधीच आपण या सत्तेतून बाहेर पडावे असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.जेव्हा जिल्हा परिषदेतील युती तोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात येत होती त्यावेळी मात्र भाजपच्या काहींनी मात्र युती कशाला तोडायची राहू द्या दीड वर्षानंतर बघू असेही विचार माडंल्याची चर्चा समोर आली आहे.