शिक्षक संघाच्या दुफळीने ग्राहक पतसंस्थेवर शिक्षक समितीप्रणित सहकार पॅनेलचा कब्जा

0
18

गोंदिया- गेल्या दोन दशकापासून एकहाती सत्ता मिळविणाèया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला भंडारा जिल्हा परिषद कर्मचारी ग्राहक पतसंस्थेची सत्ता संघातील सत्तेच्या लालची व स्वतःला बुद्धिवंत म्हणवून घेणाèयामुळे वाचविता आली नाही.प्राथमिक शिक्षक समितीप्रणित सहकार पॅनेलने मात्र एकमेकाविरुद्ध उभे ठाकलेल्या संघाच्या दुफळीचा लाभ घेत ग्राहक पतसस्थेंवर आपला झेंडा रोवला आहे.ग्राहक पतसंस्थेत झालेल्या पराभवाचे पडसाद गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीसह शिक्षक पतसंस्थेच्या कारभारावर नक्कीच पडणार असून भविष्यात शिक्षक पतसंस्थेच्या बैठकीत संघाचेच सदस्य एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाला या निवडणुकीत फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले त्यामध्ये गोंदिया पंचायत समितीमधून विद्यमान अध्यक्ष नूतन बांगरे आणि गोरेगाव,सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव गटातून विजय डोये हे विजयी झाले.विशेष म्हणजे एस.यु.वंजारी,डी.टी.कावळे,आनंद पुंजे,नाननबाई बिसेन यांनी उभे केलेले प्रगती पॅनेलचे एकही उमेदवार गोंदिया जिल्ह्यातून निवडून येऊ शकले नाही.त्यातच गोंदिया जिल्हा परिषद गटातून अपक्ष पण प्राथमिक शिक्षक समितीसमर्थित सहकार गटाचे शैलेश बैस हे विजयी झाले.गोंदिया भंडारा जिल्हा मिळून १९ जागेकरिता ही निवडणूक झाली होती.यात प्रगती पॅनेलचे ५,सहकार पॅनेलचे ११,एकता पॅनेलचे २ आणि कपबशी १ असे उमेदवार निवडून आले.तिरोडा गटातून सहकार पॅनेलचे पी.आर.पारधी,मोहाडी गटातून किशोर ईश्वरकर, लाखनी गटातून विलास टिचकुले,तुमसर गटातून दिनेश घोडीचोर,आमगाव,देवरी व सालेकसा गटातून सुरेश गजानन कश्यप,जयी झाले.