शेंदुर्जना खुर्द शिवारात बिबट्या मृत अवस्थेत

0
77

चांदुर रेल्वे– चांदुर रेल्वे वनपरीक्षेत्रात येणाऱ्या शेंदुर्जना खुर्द येथील शेतशिवारात शनिवारी एक बिबट्या मृत अवस्थेळ आढळला असुन मानेवर मार असल्यामुळे शिकारीमुळे मृत्यु झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. सविस्तरवृत्त असे की, चांदुर रेल्वे वरून अवघ्या 18 किमी अंतरावर असलेल्या शेंदुर्जना खुर्द येथील शेतकरी तरोडकार यांच्या शेतशिवारात शनिवारी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. त्यामुळे परीसरातील नागरीकांनी एकच गर्दी केली होती. व नंतर वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बिबट्याचा मृत्यु हा शनिवारी सकाळी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान घडली. तसेच बिबट्याची शिकार झाली असल्याचा संशयही व्यक्त केल्या जात आहे. कारण बिबट्याच्या मानेवर जखमेचे निशान आढळुन आले आहे. याबाबत चांदुर रेल्वेचे वनअधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमनध्वनी बंद होता. पुढील कारवाई प्रक्रीया वनकर्मचारी करीत होते..