ट्रक अंगावर उलटून शेतकर्याचा मृत्यू

0
12

सडक अर्जुनी, ता. १२ : चालकाचे स्टिअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक शेतकèयाच्या अंगावर उलटला. या अपघातात शेतकèयाचा जागीच मत्यू झाला. ही घटना वडेगाव- परसोडी गावाच्या मधोमध रविवारी (ता. १२) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. मोहन दोनोडे (वय ६०, रा. वडेगाव ) असे मृताचे नाव आहे.
सीजी ०४- जेडी ०१८३ क्रमाकाचा ट्रक कोहमाèयाकडून गोंदियाकडे धान भरून येत होता. दरम्यान, वडेगाव – परसोडीच्या मधोमध शेतशिवारालगत चालकाचे स्टिअरिंवरून नियंत्रण सुटल्याने ट्रक विरूद्ध दिशेने जाऊन उलटला. या वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात शेतीकामे करीत असलेले मोहना दोनोडे हे ट्रकखाली दबले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिसांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.