अवनी, भावना, मोहना बनल्या फायटर पायलट

0
6

वृत्तसंस्था
हैदराबाद – भारतीय महिला आज (शनिवार) आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करण्यास सज्ज असून, प्रथमच तीन महिला वैमानिक लढाऊ विमाने चालविणार आहेत. अवनी चतुर्वेदी, भावना कंठ आणि मोहना सिंह अशी या तीन फायटर पायलटची नावे आहेत.

भारतीय हवाई दलाला आज पहिली महिला लढाऊ वैमानिकांची तुकडी मिळणार आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख मार्शल अरुप रहा यांनी महिलादिनी याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे या तीन महिला फायटर पायलटांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, हकीमपेठ येथे आज होत असलेल्या पासिंग आऊट परेडनंतर त्या हवाई दलातील लढाऊ विमानाच्या वैमानिक ठरतील.