2000 कोटींच्‍या ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णी आरोपींच्या यादीत

0
5

ठाणे- ड्रग्ज रॅकेट प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे असून, नव्या पुराव्यांच्या आधारे ममता आरोपी आहे. सध्‍या ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी केनियामध्ये असल्‍याची माहिती ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुराव्यांच्या आधारावर ममता कुलकर्णी आता ड्रग रॅकेट प्रकरणात आरोपी असून, सीबीआयमार्फत ममता कुलकर्णीविरोधात रेड कॉर्नर नोटीस पाठवण्याची विनंती इंटरपोलला करणार आहोत, असेही ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत म्‍हटले आहे. ड्रग तस्करांच्या बैठकीत ममता कुलकर्णी उपस्थित होती, ममताविरोधात 2 आरोपींची साक्ष, असल्‍याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
याआधी 8 जणांना या प्रकरणात अटक करण्‍यात आले होते. मात्र आता आणखी पुरावे मिळाल्यानंतर 10 जणांना अटक करण्‍यात आल्‍याची माहिती ठाणे पोलिस आयुक्‍तांनी दिली आहे. ममता कुलकर्णी व विकी गोस्वामी सध्या केनियात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, असेही पोलिस आयुक्त परमवीर सिंह म्‍हणाले.
एप्रिल आणि मे महिन्यामध्‍ये ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्‍ये अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा पती विकी गोस्वामीचे नाव पुढे आले होते. तो सध्या केनियामध्ये असल्‍याची माहिती आहे.