यवतमाळ :आगामी दिवसांमध्ये (LokSabha elections) लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया होऊ घालणार आहे तर, दुसरीकडे कुठल्या मतदार संघात कुणाला संधी मिळणार या प्रश्नाच्या उत्तराकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. शिवाय लोकसभेची जागा कुठल्या पक्षाला मिळणार, यावरून तर तर्कवितर्क लावण्यात येत होते. दोन दिवसांपूर्वीच यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात शिवसेना उबाठाकडून माजी मंत्री संजय देशमुखांना (Sanjay Deshmukh) उमेदवारी जाहीर करण्यात आली.
सत्ताधारी पक्षाकडून ही जागा (ShivSena Shinde) शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत गेल्या तीन दिवसांपासून उत्सुकता लागली होती. सरतेशेवटी महायुतीची उमेदवारी विद्यमान खासदार भावना गवळी (MP Bhavna Gawli) यांना जाहीर करण्यात आली आहे.