चंद्रपूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवतळेंचा राजीनामा,भाजपच्या संपर्कात

0
12

चंद्रपूर,दि.29-चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व वरिष्ठ नेते प्रकाश देवतळेंनी आपल्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पुर्व विदर्भात काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.तेली समाजाला उमेदवारी देतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांने डावलल्याचा व घराणेशाहीला पाठबळ नाना पटोले देत असल्याचा आरोप देवतळे यांनी केला आहे.विशेष म्हणजे देवतळे यांनी तेली समाजाकरीता लोकसभेची उमेदवारी मागितली होती.देवतळे हे वड्डेटीवार गटाचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे.राजीनामा दिल्यानंतर ते भाजपच्या नेत्यांशी संपर्कात असून भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.