ओबीसींची जातनिहाय जनगणना व शेतकर्यांना एमएसपी लागू करणार-राहुल गांधी

0
17

खेमेंद्र कटरे- गोंदिया/भंडारा,दि.१३- आमची सरकार येताच आम्ही सर्वात प्रथम ओबीसींसह सर्वांचीच जातनिहाय जनगणना करण्यासोबतच  आरक्षणाची ५० टक्केची असलेली मर्यादा हटविण्याचा निर्णय घेतला आहे.शेतकर्यांना कानुनी एमएसपी देण्याची ग्वाही आम्ही देत आहोत. ओबीसी, आदिवासी,दलीत समाजाची आर्थिक बाजू तपासण्यासोबतच त्यांच्या संंपत्तीचेही विश्लेषण करण्यात येणार आहे.महिलांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात पाहिजे तसा मानसन्मान व वेतन मिळालेला नाही,त्यामुळे आमचे सरकार महिलांनाही सरकारी नोकरभरतीत ५० टक्के आरक्षणासह गरीबीरेषेखालील कुटुंबातील एका महिलेला वर्षाला १ लाख रुपये देण्याचे नियोजन आम्ही केले असून दरमहिन्याला ८५०० रुपये आपल्या बँँक खात्यात मिळणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी दिली. ते भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारसभेत आज(दि.१३)बोलत होते.
देशाच्या प्रथम व्यक्ती असलेल्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू या आदिवासी समाजातील असल्यामुळेच त्यांना राममंदिराच्या शुभारंभप्रसंगी निमंत्रित करण्यात आले नाही.कारण त्या आदिवासी समाजाच्या आहेत,फक्त धर्माच्या नावावर जनतेल भ्रमित करण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योगपतींकरीता हा देश चालविला असून त्याचा लाभ मोजक्या उद्योगपतींना होत आहे.जेव्हा जेव्हा मोदींची सरकार येते तेव्हा तेव्हा अदानीसारख्या उद्योगपंतीचे शेयर मुल्य वाढते त्यामुळे हे सरकार अदानी अंबानीचे सरकार म्हटले जात असल्याची राहुल गांधी यांनी केली.महाराष्ट्रातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ मोदीजींनी व्यापारी अदानीला विकले आहे. भारतातील २२ लोकांजवळ एवढी संपत्ती आहे की देशातील ५० टक्के लोकसंख्येजवळ आहे.हिंदू मुस्लीम करीत एका जातीला दुसर्या जातीसोबत भांडण लावण्याचे काम देशातील सरकार करीत आहे.

आम्ही जो घोषणापत्र तयार केला,तो बंंद कमर्यात नव्हे तर देशातील हजारो लोकांकडून, शेतकरी,कामगार, महिलांसोबत चर्चा करुन तयार करण्यात आलेला आहे.हा काँग्रेस पक्षाचा घोषणापत्र नसून तो जनतेचा घोषणापत्र असून आपल्या मनातील गोष्ट आम्ही येथे लिहून ठेवल्याचा उल्लेख सुरवातीलाच राहुल गांधी यांनी केले.

कोरोना काळात आमच्या देशाचे प्रधानमंत्री थाळी वाजविण्याचे व मोबाईलचे लाईट लावण्याचे काम करीत होते,मात्र कोरोना काळात जनतेला त्यांनी मदत केली नाही.प्रधानमंंत्री मोदीजी म्हणतात मी ओबीसी आहे.परंतु त्या समाजाकडे  लक्ष देत नाही.या देशात जेवढी लोकसंख्या आदिवासी,दलीत,ओबीसी(पिछडा वर्ग)यांची आहे,त्यांची हिस्सेदारी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नाही आहे.त्य़ांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे.प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात आज या संवर्गातील व्यक्ती एकही मोठ्या पदावर नाही.त्याचप्रमाणे देशातील २०० मोठ्या कंपन्याचा व्यवस्थापनाकडे बघा तिथे ओबीसी,दलीत आदिवासी समाजाचा एकही व्यक्ती नाही.ज्यांची ९० टक्के हिस्सेदारी असायला हवे,त्यात त्यांना स्थान नसल्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला.देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याकरीता संसदेत असलेले ९० आयएएस अधिकारी पैकी फक्त १ आदिवासी व ३ ओबीसी आयएएस अधिकारी आहेत,ते सुध्दा कुठल्या तरी लहान विभागात.त्यामुळे जेव्हा देशाची सरकार आर्थिक नियोजन करते त्यावेळी या समाजातील तिथे प्रतिनिधित्व नसल्यानेच वाटा मिळत नाही,तर नियोजन करण्याचा अधिकारही नाही.

पुढे राहुल गांधी म्हणाले की,अग्निवीर योजना आमचे सरकार येताच आम्ही रद्द करणार आहोत.आम्हाला दोनप्रकारचे शहीद नकोत,एक शहीद ज्यांना पेंशन मिळेल त्यांच्या कुटुंबाची रक्षा होणार व दुसरा अग्नीविर शहिद ज्यांना पेंशन मिळणार नाही,शहिदचा दर्जा मिळणार नाही,कुटुंबाला मदत मिळणार नाही अशी योजना आमचे सरकार येताच बंद करणार.कारण ही योजना आर्मीने तयार केली नसून प्रधानमंत्री कार्यालयाने तयार केलेली योजना आहे.तसेच लघुउद्योगावर लावलेली जीएसटी रद्द करणार,एकच टॅक्सप्रणाली राहणार.शेतकरी वर्गावरही लादलेला १८ टक्के जीएसटी आम्ही रद्द करणार आहोत.देशात ३० लाख रिक्त पदे शासकीय कार्यालयामध्ये आहेत.ती सर्व पदे आमचे सरकार येताच भरण्याची प्रकिया आमचे सरकार करणार आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डाॅ.प्रशांत पडोले यांच्या निवडणुक प्रचाराकरीता आज साकोली येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांची सभा पार पडली.या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार,खासदार चंद्रकांत हांडोरे,माजी आमदार माणिकराव ठाकरे,आमदार अभिजित वंजारी.पुर्व विदर्भातील महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ.प्रशांत पडोळे,आमदार विकास ठाकरे,नामदेव किरसान,प्रतिभाताई धानोरकर,श्यामकांत बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.