भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे ‘तुझे माझे जमेना’!

0
14

* पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन मात्र बूथ कार्यकर्ते संभ्रमात
गोंदिया – भंडारा – गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा १७ एप्रिल रोजी सायंकाळी थंडावलेअसून उद्या १९ एप्रिलला मतदान होत आहे. राज्यातील भाजप-राष्ट्रवादी युतीचा परिणाम आता कार्यकर्त्यांवर होत आहे. पदाधिकारी यांचे मनोमिलन झाले असले तरी बूथ कार्यकर्ते अजूनही संभ्रमात असून अनेक गावांत भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘तुझे माझे जमेना’ अशीच परिस्थिती अनुभवास मिळत आहे.
राज्यात पारंपरिक विरोध असलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली. प्रचारही झाला. आता मतदानाच्या एक दिवसा आधी प्रत्येक पक्षाकडून बूथ लावण्यासाठी जबाबदारी दिली जाते. बूथ कार्यकर्ते पक्षाच्या आदेशानुसार कार्य करतात. याआधी एकमेकांच्या विरोधात बूथ लावून कार्यकर्त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे काम या कार्यकर्त्यांकडून केले जात होते. मात्र यावेळी बूथ नियोजन व खर्च नियोजन करताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पंचाईत झाल्याचे पहावयास मिळत आहे. भाजप च्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन करताना आपल्या कार्यकर्त्यांवर बूथ नियोजनाची जबाबदारी दिली असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अडचणीचे ठरत आहे. संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे ठीक आहे पण आमचे काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे. एकंदरीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘तुझे माझे जमेना’ अशीच अवस्था असल्याचे जाणवत आहे.