सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला, 8 जवान शहीद

0
14

वृत्तंसंस्था
जम्मू काश्मीर, दि. 25 – पंपोर येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 8 जवान शहीद झाले आहेत. 17 जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांना सीआरपीएफ जवानांनी दिलेल्या उत्तरात 2 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

फायरिंग रेंजवर सराव करुन सीआरपीएफ जवान परतत असताना त्यांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला,अशी माहिती सीआरपीएफ कमांडंट राजेश यादव यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जवानांनी प्रत्युत्तर दिलं ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचंही राजेश यादव यांनी सांगितलं आहे.